नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील का.वि. प्र. संस्था भालेर संचलित श्रीमती क. पु.पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात येथे दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरु प्रती आदर व्यक्त करण्यासाठी विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी केली.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक सी. के. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या प्राचार्या सौ. विद्या चव्हाण पर्यवेक्षक अनिल कुवर होते. सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचा बुके व गुलाब पुष्प देवून सन्मान केला. तीस विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेवर आपले मनोगत व्यक्त केले. दहावीच्या विद्यार्थिनींकडून कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सौ व्ही. आर. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निकिता धनगर हिने केले तर आभार प्रदर्शन कू. डिंपल मराठे हिने केले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.









