Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आषाढी एकादशी व बकरी ईद च्या निमित्ताने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नंदुरबार जिल्हा पोलीसांचा केला गौरव

team by team
July 4, 2023
in क्राईम
0
आषाढी एकादशी व बकरी ईद च्या निमित्ताने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नंदुरबार जिल्हा पोलीसांचा केला गौरव
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा हा अंत्यत हा संवेदनशिल जिल्हा म्हणुन महाराष्ट्र राज्यात ओळखला जातो. अशा या जिल्ह्यात या वर्षी आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी आले होते. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात जणता काही अंशी भयभीत झाल्या होत्या.
नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदरची बाब लवकर ओळखुन जिल्हा स्तरावर शांतता समितीच्या व मोहल्ला समितीच्या मिटींगा घेवुन वातावरण आल्हादायक बनविले. तसेच त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील जनतेला बकरी ईद व आषाढी एकादशी निमीत्ताने शांतता राखण्याचे आवाहन देखील केले होते. तसेच त्यांनी बकरी ईद च्या दिवशी मुस्लीम बांधवानी कुर्बानी देवु नये असा एक विचार मांडला. तसेच जिल्ह्यात चेक नाके लावुन गायी व बैल यांची कोणतीही अवैधरित्या वाहतुक होवु नये म्हणुन कसोशीने लक्ष दिले.
पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्व मुस्लीम बांधवानी सकारात्मक प्रतिसाद देवून बकरी ईद च्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला. तसेच पोलीसांनी उचारलेले चेक नाके वर पोलीसांनी मोठ्या प्रमाणात गायी व बैल यांचे वाहतूक होणार नाही याची काळजी घेतली व मोठ्या प्रमाणात गायी व बैलांची वाहतुक करणारे वाहने पकडुन त्यांची रवानगी गोशाळेत केली. त्यामुळे गायी व बैलांना मोठ्या प्रमाणात अभय मिळाले.
पोलीसांनी केलेल्या या कामगिरीमुळे बकरी ईद व आषाढी एकादशी सण हे उत्साहात व आनंदात साजरा झाले. त्यामुळे जिल्हात सौहादांचे वातावरण निर्माण झाले. या गोष्टीची जाणीव ठेवून माळीवाडा परिसरातील नागरिकांनी नंदुरबार जिल्ह्यातील पोलीसांचा श्री. संत सावता माळी मंदिरात उपविभागीय अधिकारी संजय महाजन नंदुरबार शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचा प्रातिनिधीक स्वरुपात पुष्पगुच्छ देवून गौरव केला.
सदर कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी  संजय महाजन यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना माळी समाजातील नागरिकांनी पोलीसांचा केलेल्या गौरवाबद्दल आभार मानून आगामी सण उत्सव देखील शांततेत पार पाडण्याचे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमास माळी समाजाचे पंच कमिटीचे सभासद माणिक माळी, तसेच नगरसेवक आनंद माळी, नगरसेवक लक्ष्मण माळी, स्वामी विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक निया माळी, उद्योजक
अविनाश माळी, भाजपा सरचिटणीस निलेश माळी, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समीती संचालक प्रकाश माळी, बाबुलाल माळी, जगन्नाथ माळी, विजय माळी, व इतर 50 ते 60 समाज बांधव उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

गुरु हा आध्यात्मिक शिक्षक,मार्गदर्शक असतो : पंकज पाठक

Next Post

भालेर येथे विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा असा व्यक्त केला आदर

Next Post
भालेर येथे विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा असा व्यक्त केला आदर

भालेर येथे विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा असा व्यक्त केला आदर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add