नंदुरबार l प्रतिनिधी
एस. एम. के. डी. एज्युकेशन सोसायटी नंदुरबार येथील इंग्लिश मीडियम (CBSE) शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
सौ. मीना किशोर दराडे एज्युकेशन सोसायटी नंदुरबारचे संचालक शुभम दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्युनिअर कॉलेज प्राचार्य बबन बागुल , तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका भाग्यश्री बच्छाव उपस्थित होत्या. प्रथम सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरु अर्थात शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी गुरु या नात्याने आरती ओवाळून पाया पडत नमन केले. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा बाबत अधिक माहिती दिली. तर प्राध्यापिका भाग्यश्री बच्छाव यांनी कविता वाचून विद्यार्थ्यांना गुरु बद्दल माहिती दिली.
यावेळी एम. के. डी. इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा जाधव, पॉलिटेक्निक कॉलेज प्राचार्य सचिन भोंगळे, कुणाल फटकाळ , शिक्षिका योगिता तांबोळी, मनीषा आंधळे, चरिता पाटील, पल्लवी गवांदे, जीत थनवार, निलेश गावित, विनोद भालेराव, अनिल गावित तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बबन बागुल, हिरे सर, भाग्यश्री बच्छाव, आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.









