नंदूरबार l प्रतिनिधी
दि.१ जुलै रोजी के. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने याहा मोगी सभागृह जिल्हा परीषद, नंदूरबार येथे जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली कृषि दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्ह्यातील शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त तसेच पिक स्पर्धेमध्ये विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या कृषि विषयक केलेल्या उल्लेखनिय कार्याचा गौरव करून डॉ.सुप्रिया गावित यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतमालाचे मूल्य वृध्दी करून कसा फायदा होतो याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नंदूरबार जिल्हा निर्मितीच्या रौप्य महोत्सवाच्याही शुभेच्छा उपस्थितांना दिल्या. तसेच जिल्हा परीषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी देखिल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याबद्दल मार्गदर्शन केले.
कृषि दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त तसेच पिक स्पर्धेमध्ये विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, कृषी सभापती हेमलता शितोळे, शिक्षण सभापती गणेश पराडके, महिला बालकल्याण सभापती संगिताताई गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कृषि विकास अधिकारी प्रकाश खरमाळे यांनी प्रस्तावना करताना कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेल्या कार्याचा तसेच त्यांचा जीवन परीचय करून दिला.
सदर कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नंदूरबार राकेश वाणी, कृषि उपसंचालक वसंत चौधरी, उपविभागीय कृषि अधिकारी चेतनकुमार ठाकरे, कृषि विकास अधिकारी जिल्हा परीषद नंदूरबार प्रकाश खरमाळे, जिल्हा कृषि अधिकारी (सा) जिल्हा परीषद नंदूरबार उज्वलसिंग गिरासे, मोहिम अधिकारी जिल्हा परीषद नंदूरबार सचिन देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. जयंत उत्तरवार विषय विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र कोळदा यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी उमेश भदाणे यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमास विस्तार अधिकारी एम. जी. विसपुते, श्रीमती. टि.एस.पाटील तसेच कृषि विभागातील कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृषि अधिकारी अनिल कागणे यांनी केले.









