Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी योजना

team by team
July 1, 2023
in क्राईम
0
न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी योजना

नंदुरबार l प्रतिनिधी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार कार्यक्षेत्रातील नंदुरबार,नवापूर व शहादा तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

अ गटात-उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजनेत  अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना बिगर यांत्रिकी बोट व मत्स्यजाळेसाठी अर्थसहाय्य, युवकांना सामुहिक युवक गटाना बॅन्ड संच व इतर साहित्य, तसेच अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना पॉवर विडर मशिन घेण्यासाठी 85 टक्के अर्थसहाय्य देण्यात येईल.

क गटात- मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजनेत अनुसूचित जमातीच्या ग्रामपंचायती व बचतगट यांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी भांडी संच उपलब्ध करून देणे,  युवकांना क्रिकेट खेळ खेळण्यासाठी क्रिकेट साहित्य संच, ग्रामपंचायतीना सार्वजनिक कार्यक्रमासाठी भजनी साहित्य तसेच ग्रामपंचायतीना सार्वजनिक कार्यक्रमासाठी मंडप, खुर्ची, व इतर साहित्य उपलब्ध करुन देणे, तसेच अनुसूचित जमातीच्या पंरपरागत कलापथक व प्रबोधनकारांना समाजात जनजागृती करण्यासाठी साहित्य उपलब्ध करुन देण्यात येतील.

या योजनांसाठी इच्छुक आदिवासी लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून याबाबतचा विहित नमुना फॉर्म प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार येथे 3 जुलै 2023 ते 14 जुलै 2023 या कालावधीत रविवार आणि शासकीय सुट्टी वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत वाटप केले जातील व स्विकारले जातील.  मुदतीनंतर फॉर्म वाटप अथवा स्विकारले जाणार नाहीत.

पात्र आदिवासी लाभार्थ्यांनी योजनेच्या आवश्यकतेनुसार जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखला, ग्रामसभा ठराव, रहिवासी दाखला, आधारकार्ड, बँक पासबुक, योजनेच्या अनुसरून कागदपत्र तसेच यापूर्वी सदर योजनेतून लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्रांची छायांकित प्रत अर्जासोबत जोडावी असेही प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती करनवाल यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील अल्पसंख्यांक व अल्पभाषिक शाळांची व संस्थांची चौकशीची आम आदमी शेतकरी संघटनेची मागणी

Next Post

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add