मोलगी
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी साजरा करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव ईश्वर वसावे व अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी हे होते.
या आधुनिक जगात बालपणापासूनच विविध सांस्कृतिक घटकांची ओळख व्हावी हा उद्देश लक्षात घेऊन आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल व रखुमाईच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या मुलांनी आकर्षक विविध सांस्कृतिक पोशाख परिधान करुन विठ्ठल व रखुमाईच्या पालखी हाती घेत मिरवणुक काढण्यात आली.
या मिरवणुकीत नृत्याचाही आनंद घेतला व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोटूसिंग वळवी यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक लीला वसावे, मनीषा वसावे, हीराबाई वळवी यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेच्या शिक्षिका मनीषा वसावे यांनी मानले.








