नंदूरबार l प्रतिनिधी
अर्हत प्रतिष्ठान नंदुरबार च्या वतीने आयोजित नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ. हिना विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य क्रीडा महोत्सव सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी जेनी पार्क नंदुरबार येथे सायंकाळी 5 वाजता अंडर फोर्टीन मुले सिक्स साईड नाईट क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन करण्यात आले होते.
या टूर्नामेंटचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती खा.डॉ. हिना गावित, ॲड. राजश्री वळवी, आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, मोहन खानवाणी, डॉ. दिनेश बैसाने, संतोष शिरसाट, श्री.भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षबोध बैसाणे, संदीप खलाणे,विजय जगताप, खुशाल शर्मा, प्रवीण माळी, किरण मिस्तरी, योगेश कुंभार,दीपक बंडीवार, किरण खोकले, सिद्धार्थ साळुंके, गौतम पानपाटील,सौरभ साळुंके, शुभम कासार, अजय बागले, उमेश बंजारा, संभाजी सोनवणे,सचिन पिंपळे,नंदूअंकूश कुकरेजा, आयुश गोगिया, श्रेयांश अग्रवाल, मोहीत नानकाणी,रवीन्द्र शिंदे, पाटील,रामा हटकर,आशिष कडोसे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षबोध बैसाने यांनी केले आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक अर्हत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी केले.








