नंदुरबार l प्रतिनिधी
येथील चावरा इंग्लिश मिडीयम स्कुल सी.बी.एस.ई.चा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी निल भरत पेंढारकर हा सन २०२३-२४ साठी घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालयाच्या पात्रता परिक्षेत पात्र ठरला आहे.
निल पेंढारकर हा श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कुलचे माध्यमिक शिक्षक भरत पेंढारकर व नंदुरबार जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिका सौ.सुनिता पेंढारकर (सोनवणे) यांचा मुलगा आहे. त्याला निलेश पाटील सर यांच्यासोबत शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक फादर टेनी, फादर सिजीन व सिस्टर सर्वच स्तरावरुन त्यांचे कौतुक होत आहे.








