तळोदा l प्रतिनिधी
शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहातर्फे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे योग प्रशिक्षक सविता कलाल, स्वप्नील राणे व विद्यामंदिरातील प्राचार्य सुनिल परदेशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दिले.प्रसंगी प्राणायाम तडासन कपालभारती भ्रामरी प्राणायाम वृक्षासन इत्यादी योगासन प्रकार घेण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी मुख्या.पुष्पा बागुल, प्राचार्य सुनिल परदेशी, प्रिन्सिपल पी.डी .शिंपी मुख्या. गणेश बेलेकर, मुख्या.भावना डोंगरे, उप प्राचार्या कल्याणी वडाळकर सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अरुण कुवर यांनी मानले.








