नंदूरबार l प्रतिनिधी
का.वि.प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर ता.नंदूरबार येथे योगदिन उत्साहात संपन्न झाला.
श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे २१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थी व विद्यार्थिनींना योगासन बाबत क्रीडा शिक्षक एस. एस. पाटील यांनी योगासनाचे महत्त्व सांगितले.
इ.९वी १०वी च्या विद्यार्थ्यांनी व क्रीडा शिक्षिका एस. पी. पाटील यांनी प्रात्यक्षिक सादर केले. या विद्यार्थ्यांनी कपालभारती, अनुलोम -विलोम विविध योगासनांचे चे प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, प्राचार्य विद्या चव्हाण, पर्यवेक्षक श्री. कुवर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील , शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनींनी यांनी परिश्रम घेतले.








