नंदुरबार l प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त एस एम के डी एज्युकेशन सोसायटी नंदुरबार येथील एम. के. डी. इंग्लिश मीडियम (CBSE) शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सौ. मीना किशोर दराडे, एज्युकेशन सोसायटी नंदुरबारचे चेअरमन शुभम दराडे, पॉलिटेक्निकल कॉलेज प्राचार्य सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. योगा शिक्षिका निकिता ठक्कर यांनी सुरुवातीला विद्यार्थी व शिक्षकांना योगाबद्दल जागरूकता व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. योग हे आरोग्य निरोगी घालविण्याचे एक विज्ञानच आहे. शारीरिक आजार दूर करण्यासाठी आणि मानवी शरीर व आत्मा सुखी राहण्यासाठी दररोज योगासने करणे महत्त्वाचे असून बालपणापासूनच शारीरिक व्यायामासाठी योगा करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना यावेळी करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे महत्त्व पटवून देत विविध योगासने करून योगा शिक्षिका निकिता ठक्कर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने शिकविली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने आपले योगदान देत योगसाधना केली.
यावेळी इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) चे निरीक्षक रुपनर सर, मुख्याध्यापिका पुष्पा जाधव, शिक्षिका योगिता तांबोळी, मनीषा आंधळे, चरिता पाटील, पल्लवी पगारे, जीत थनवार, निलेश गावित, विनोद भालेराव, अनिल गावित आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








