नंदूरबार l प्रतिनिधी
डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता. जि. नंदुरबार येथे योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ. हेडगेवार सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष ललितकुमार पाठक, संस्थेचे विश्वस्त धनराज कातोरे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी उमेश शिंदे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रमोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.इयत्ता सहावीचे विद्यार्थी आदित्य व जागृती यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. क्रीडा शिक्षक योगेश निकुम व योगशिक्षक नरेंद्र मराठे यांनी योगासन व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले व सर्व विद्यार्थ्यांकडून करवून घेतले.








