नंदूरबार l प्रतिनिधी
स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्याची रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याबद्दलच्या मोबदल्यात 45 हजाराची लाच घेणाऱ्या नवापूर येथील सार्वजनिक हायस्कूलच्या वरीष्ठ लिपीकास अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,नवापूर तालुक्यातील तक्रारदार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या रजा रोखिकरणाची रक्कम विनोद साकरलाल पंचोली, वरीष्ठ लिपीक (दी. एन. डी. अँड एम. वाय. सार्वजनिक हायस्कूल), नवापूर यांनी दिलेल्या धनादेशाद्वारे तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाली होती. तक्रारदार यांची रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याबद्दलच्या मोबदल्यात विनोद पंचोली यांनी तक्रारदार यांच्याकडून ४५ हजाराची लाचेची मागणी करून ,
२१ जून २०२३ रोजी सदर लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली आहे. म्हणून
विनोद पंचोली यांच्या विरुद्ध नवापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक
माधव रेड्डी, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पो. उपअधीक्षक, ला.प्र.वि. नंदुरबार राकेश चौधरी यांच्या नेतृत्वात सदरची कारवाई पोलीस निरीक्षक समाधान एम.वाघ, पोलीस निरीक्षक, पोहवा विजय ठाकरे, पोना संदीप नावडेकर, चापोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली आहे.








