Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करावा; सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांचे आवाहन

team by team
June 21, 2023
in शैक्षणिक
0
नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करावा; सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या नंदुरबार, नवापूर व शहादा या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2023-2024 या शैक्षणिक वर्षांत शहरातील इंग्रजी नामांकित निवासी शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी 30 जून 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

प्रवेश अर्ज 22 जून 2023 पासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार या ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत विनामुल्य मिळतील. परीपुर्ण  भरलेले प्रवेश अर्ज शासकीय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार येथे स्विकारण्यात येतील त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले  जाणार नाहीत.

प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पालक किंवा विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत, दारिद्र्यरेषेच्या दाखल्याची सत्यप्रत, दिव्यांग असल्यास सक्षम दाखला जोडावा. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्य प्रमाणपत्राची प्रत जोडावी. पालकांच वार्षिंक उत्पन्न 1लाखापेक्षा जास्त नसावे. (सोबत 2022-23 वर्षांचे उत्पन्न दाखला जोडावा)

विद्यार्थ्याचे पालक शासकीय,निमशासकीय सेवेत नसल्याबाबत  हमीपत्र जोडावे. महिला पालक विधवा,घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्यू प्रमाणपत्र, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पूर्ण असावे.

अर्जासोबत 2 पासपोर्ट फोटो आणि जन्म तारखेचा पुरावा म्हणुन ग्रामसेवक, नगरपालिका यांचा  दाखला जोडावा. अर्जासोबत विद्यार्थ्याचे, वडीलांचे व आईचे आधार कार्डची साक्षांकित प्रत जोडावी. विद्यार्थी व पालक यांच्यावर या अटी शर्ती व नियम बंधनकारक राहतील. कागदपत्राची अपुर्णता असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.

अर्जासोबत विद्यार्थ्यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र जोडावे. प्रवेशा बाबतच्या अटी व शर्ती प्रवेश अर्जात नमूद असून प्रवेश अर्ज परीपुर्ण भरुन 30 जून 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जमा करावेत. प्रवेशासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्रीमती करनवाल यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अरे व्वा : राज्यातील साडे तीन लाख युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे  

Next Post

नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त घोषित होणार

Next Post
नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त घोषित होणार

नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त घोषित होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add