नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात बेकायदेशीर भूजल उत्खनन आढळल्यास, भूजल संबंधित तक्रार निवारणासह बेकायदेशीर विहिरी सील करुन दोषीवर कारवाई करण्याचे अधिकार सर्व तहसिलदारांना प्रदान करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहेत.
केंद्रीय भूजल प्राधिकरण, भारत सरकारच्या आदेशान्वये अशी कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात अनेक फर्म,उद्योगाद्वारे वाणिज्य वापरासाठी भूगर्भातून पाणी काढून विक्री करत असल्याचे आढळून येत असून अशा फर्म, उद्योगावर, भूजल उत्खनन अथवा उपसा करणारे तसेच भूजलाशी संबंधित तक्रार निवारणासह बेकायदेशीर विहिरी सील करुन संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तहलिसदारांना प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती खत्री यांनी दिली आहे.








