Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विसरवाडी येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या

team by team
June 20, 2023
in Uncategorized
0
विसरवाडी येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या
विसरवाडी l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे भरवस्तीत एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या करून दागिन्यासह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. दि. १९ जुन सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एकाच वेळी तीन घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या प्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विसरवाडी येथील शनिमंदीर परिसरातील कॉलनीत राहणारे शिक्षक एन. व्हि. वाघ हे दोन दिवस बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याचा फायदा घेत कुलुपाची कडी तोडून घरात  प्रवेश केला घरातील तीन ते चार लाकडी व लोखंडी कपाटे, तिजोरी फोडुन बेडरुममध्ये पेटी पंलग, अंथरून इतर सामान अस्ताव्यस्त करून घरात असलेली रोख रक्कम व दागिने लंपास केले एकूण मुद्देमालाचा आकडा समजू शकला नाही तरी हजारोंचे एवज लंपास झाल्याची माहिती संबंधित घरमालकाने दिली आहे. तर पहिल्या घरफोडीतील शिक्षक एन व्ही वाघ यांच्या घराचे कुलूप हे घरापासून दोनशे मीटर लांब तिसऱ्या घरफोडीच्या ठिकाणी ग्रामपंचायत चौकात आढळून आले.
तसेच दुसरी घरफोडी ग्रामपंचायत परिसरात मागील गल्लीत राहणारे व्यवसायिक अनिल चौधरी यांच्या घरी कुलूप असल्याचा फायदा घेत कुलपाची कडी तोडून घरात असलेली दोन कपाटे फोडली असून सामान अस्तव्यस्त करून तिजोरीत असलेले सुनेचे सोन्याचे कानाची दागिने तसेच जुन्या व विशेष नंबर असलेल्या नोटांचा संग्रह करून ठेवलेली हजारोंची नोटा काही हजारोंची रक्कम लंपास करत तिसऱ्या घरफोडीचा पुढील मोर्चा ग्रामपंचायत पुढच्या गल्ली राहणारे शिक्षक दांपत्य नरेंद्र पगारे हे कुटुंबीयांसमवेत घरात वरच्या मजल्यावर झोपलेले असताना चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील दोन कपाटे व सामान अस्ताव्यस्त करुन हजारोंची रोख रक्कम लंपास केली आहे.
घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे हे पोलिस पथकासह दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून एकाच दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन चोरांनी या तिन्ही चोरीच्या घटना केल्याचे समजले असून तिन्ही ठिकाणी सारखेच दरवाज्याची कुलपाची कडी तोडल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर घटनेच्या अनुषंगाने नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य घेत परिसरात सीसीटीव्ही फुटेज तसेच चौकशी करीत पर राज्यातील आलेल्या एका विक्रेत्याला त्याची विचारपूस करीत माहिती जाणून घेत त्यास गावात व्यापार करण्यासाठी येण्यापूर्वी पोलीस ठाण्यात माहिती देणे आवश्यक असल्याचे समजावून सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

भाजपा राष्ट्रीय महामंत्री कैलास विजयवर्गीय दोन दिवसाच्या नंदुरबार जिल्हयाच्या दौऱ्यावर

Next Post

नवापूर शहरात सात घरफोड्या;सोन्याचांदीचे दागिन्यासह रोख रक्कम लंपास,चोरटे कॅमेरात कैद

Next Post
नवापूर शहरात सात घरफोड्या;सोन्याचांदीचे दागिन्यासह रोख रक्कम लंपास,चोरटे कॅमेरात कैद

नवापूर शहरात सात घरफोड्या;सोन्याचांदीचे दागिन्यासह रोख रक्कम लंपास,चोरटे कॅमेरात कैद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add