नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी नंदुरबारतर्फे योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मोदी @9 अभियानाच्या अनुषंगाने नंदुरबार शहर व ग्रामीण मंडलातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व सर्व सामान्य नागरिकांसाठी एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योग शिबिराला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित, खा.डॉ.हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सुप्रिया गावित आदींची उपस्थिती लाभणार आहे.









