नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेच्या ५७ वा वर्धापन दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील नेस्को सेंटरच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करीत लक्ष वेधून घेतले. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून शिवसेनेच्या वर्धापन दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी साधारणता चारशे ते साडेचारशे शिवसैनिक मुंबईच्या गिरगाव येथील नेस्को सेंटरमध्ये दाखल झाले होते. जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या जथ्थेच्या जथ्थे दुपारपासूनच कार्यक्रम स्थळी दाखल होऊ लागले. प्रत्येक शिवसैनिकाने गळ्यात भगवा गमछा घातल्याने अवघे वातावरण भगवान झाले होते.
‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजय असो’ अशा घोषणांनी नेस्को सेंटर परिसर दुमदुमून गेले होते. नंदुरबार जिल्ह्यातील नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, विविध स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी, शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मोठ्या संख्येने वर्धापन दिवस कार्यक्रमाला उपस्थित होते.








