नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील भरवाड गल्ली परिसरात काल सोमवारी दुपारच्या वेळेत किरकोळ कारणावरून दोन गटात दगडफेक करण्यात आली या दगडफेकी एका चार चाकी वाहनाचा व एका घराच्या खिडक्यांचं नुकसान झालं असून माहिती कळताच नंदुरबार पोलीस बल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार आज सोमवारी दुपारच्या वेळेत शहरातील भरवाड गल्ली परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात भांडण झाली या भांडणातून एका गटाकडून दगडफेक करण्यात आली लागलीच दुसऱ्या गटाने ही दगडफेक सुरू केली. घटनेची माहिती कळतच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्नेहदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी गुन्हा शोध पथकाचे पोलीस कर्मचारी दंगा नियंत्रण पथक यांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलीस प्रशासनाने वेळीच घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून कुठलीही जीवित आणि अथवा मोठ नुकसान या घटनेत झालेले नाही परिस्थितीवर नियंत्रण असून अफवांवर विश्वास ठेवू नये असा अहवान अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे दगडफेक करणाऱ्यांचा पोलीस प्रशासन शोध घेत असून गुन्हा दाखल करण्याचे काम शहर पोलीस ठाण्यात सुरू होते.








