नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा येथील राज्य परिवहन महामंडळाचे आगारस प्रथमच महिला चालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित चालक हिने पहिल्या दिवशी शहादा ते जयनगर या मार्गावर प्रथम वाहन चालविलेले आहे.
पल्लवी एकनाथ बेलदार असे चालकाचे नाव आहे. चालक बेलदार यांची सन २०१९ मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या भरती प्रक्रिया दरम्यान निवड झाली आहे. लगेचच पुढील वर्षी २०२०ला प्रक्षिशणाचे आदेश आले सहा महिने झाले त्यांनंतर २०२१ला प्रशिक्षण सुरु झाले कोरोना संसर्गजन्य महामारी मुळे पुन्हा प्रशिक्षण थांबले. धुळे विभाग राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत शहादा आगारात 14 जून 2023 रोजी नियुक्तीचे पत्र मिळाले. शहादा आगारात आगार प्रमुखांची भेट घेत पल्लवीने गाडीचे सूत्र हातात घेतले. सगळ्यात पहिली दुपारी शहादा ते जयनगर ही बस माझ्या आयुष्यातील सुरुवातीचा प्रवाशांना घेऊन मी चालकाचे काम सुरू केलं असे तिने सांगितले.दिवसभरात शहादा बोरद वैजाली व शेवटची ट्रिप पूर्ण करीत तिचा पहिला दिवस थांबला.

पल्लवी कुटुंबात वडील शेतकरी आर्थिक परिस्थिती खालवली असल्याने नोकरीच्या शोधात होते .वाहन चालवण्याचं तिला लहानपणापासून आवडते सेवा करण्याच्या उद्देशाने तिने गावाकडे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहक पदासाठी भरती प्रक्रिया दरम्यान निवड झाली.
प्रक्षिशणाचे पुर्ण झाल्यावर धुळे विभागात शहादा आगारात ती चालक पदावर रुजू झाली.

पहिल्या दिवशी प्रवाशी बस मध्ये बसलेले होते. पल्लवी बस चालकाचा खुर्चीवर बसली.आगारातील अधिकारी व कर्मचारी हे शुभेच्छा देण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थिती होते.पहिल्यांदाच एक महिला बस चालक पाहुन प्रवाशी उत्सुकतेने सर्व पाहत होते
राज्य परिवहन महामंडळाच्या वाहन प्रशिक्षण दरम्यानच्या अनुभव आणि कालच्या स्वतः चालक प्रवाशांना घेऊन जातानाचा अनुभव खूपच द्विगुणीत आहे.40 ते 50 कुटुंबांचा सोबत घेऊन मी चालकाचा पहिला दिवस पूर्ण केला. कुटुंब चालवताना महिलांना येणारा अनुभव आणि चालक म्हणून 40 ते 50 कुटुंबांना सोबत घेऊन चालण्याचा अनुभव हा आगळावेगळा आहे.प्रत्येकाचं लक्ष आपल्या वाहन चालकाकडे असतं
कु.पल्लवी बेलदार
शहादा आगार
बस चालकाच्या खुर्चीवर महिला बसतात मनामध्ये भीतीचे वलय निर्माण झाले आगाराचा बाहेर बस निघाली तशी हळू भीतीच्या वलय कमी होत गेले, एक महिला मोठय़ा कुटुंबातील व्यक्तीनां सोबत घेऊन चालु शकते तर बस चालकाचा पदावर कार्यरत असताना पन्नास कुटुंब प्रमुखखांची सहज जबाबदारी पेलण्याची क्षमता फक्त महिला चालक करु शकते.
काशिनाथ गोरख पाटील – प्रवाशी शहादा








