नंदुरबार l प्रतिनिधी
विश्व योग दिनानिमित्त बुधवार दि. 21 जून रोजी सकाळी सात वाजता जी.टी. पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यातत आले आहे.सदर शिबिर निशुल्क असून विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केला आहे. 2015 पासून सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. त्यानुसार नंदुरबार शहरात देखील 9 वा योग दिन साजरा होईल.यावर्षी विश्व योग संयोजन समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी,शिक्षण विभाग आणि विविध स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. 21 जून रोजी सकाळी सात वाजता जी.टि. पाटील महाविद्यालयाच्याा प्रांगणात तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम यांचे प्रशिक्षण देण्यात येईल.या शिबिरात नंदुरबार शहरातील नागरिकांनी सहकुटुंब, सहपरिवार मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, आर्ट ऑफ लिविंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जी.टी. पाटील महाविद्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,शहिद शिरीषकुमार मित्र मंडळ, श्री समस्त सुवर्णकार समाज, यांच्यातर्फे प्रा.एन. डी. माळी, नवनीत शिंदे, हिरालाल महाजन, विजय कासार यांनी केले आहे.








