नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील शनिमांडळ येथे 17 जून रोजी शनिअमावस्येनिमित्त ग्रामस्थांतर्फे दरवर्षी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यानिमित्त शनि महाराजांच्या दर्शनासाठी खान्देशासह अनेक राज्यातून भाविक हजेरी लावतात.
शनि महाराजांच्या दर्शनासाठी गुजरात, मध्यप्रदेश राज्यासह महाराष्ट्रातील भाविक दर्शनासाठी हजेरी लावत मानलेले नवस फेडतात. याठिकाणी दर्शनासाठी दूरपर्यंत रांगा लागत असतात त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन व्हावे त्याकरीता स्वयंसेवकांकडून मदत होते.
येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते असते. पूर्ण गावातून भाकरीचा प्रसाद देण्यात येत असून मराठी शाळेत भाविकांना पिठले-भाकरीचा प्रसाद वाटप करण्यात येतो. शनैश्वर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. यात्रेत हॉटेल, खेळणीसह संसारोपयोगी वस्तूंचे दुकानेही थाटली जातात.








