नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेच्या ( शिंदे गट) वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी नियोजन करण्यासाठी नाट्य मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.नंदुरबार जिल्ह्यातुन शेकडोंवर कार्यकर्ते मुंबईतील नेस्को सेंटरचे येथे १९ जून रोजी आयोजित मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात शुक्रवारी सकाळी शिवसेनेच्या शिंदे गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती.एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी उठाव केल्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेच्या यंदाच्या पहिला वर्धापन दिन असणार आहे. वर्धापन दिवस निमित्त कर्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वर्धापन दिवस निमित्त मुंबई येथील नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले आहे. या मिळण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून
शेकडोंवर कार्यकर्ते जाणार आहेत.
आयोजनासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बैठक घेतली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील,पं.स सभापती माया माळसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विक्रमसिंह वळवी,जि.प सदस्य देवमन पवार, उपजिल्हाप्रमुख कृष्णदास पाटील, तालुका प्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील आदी उपस्थित होते. प्रसंगी पालिकेचे माजी नगरसेवक,माजी सभापती,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








