नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील आलोक ॲग्रो एजन्सी या खत दुकानावर जिल्हास्तरीय गुणवंता नियंत्रक पथकाने छापे मारे करून जादा दराने विक्री करीत असलेल्या दुकानदारास रंगेहात पकडले असून त्याचा खत विक्रीचा परवाना कायम स्वरुपी रद्द करण्यात आला आहे.
कृषी विभागातील जिल्हास्तरीय गुणवत्ता नियंत्रण सर्व प्रमुख दुकानदाराची तपासणीचे काम हाती घेतले आहे.दरम्यान नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे असलेल्या आलोक ॲग्रो एजन्सी या खत दुकानावर तपासले असता युरिया खताची शासन निर्धारित दरापेक्षा जास्त दराने विक्री करीत असल्याचे भरारी पथकास आढळून आले,
दुकानदाराने जादा दराने खत विक्री करून खत नियंत्रक आदेश १९८५ चे कलम ३(३) चे उल्लंघन केल्याने संबंधित दुकानदाराचा रासायनिक खत परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला. वरील कारवाई विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी राकेश वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद नंदुरबारचे कृषी विकास अधिकारी प्रकाश खरमाळे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नंदुरबार स्वप्निल शेळके,
तंत्र अधिकारी विजय मोहिते, नवापूर तालुका कृषी अधिकारी नितीन गांगुर्डे, कृषी अधिकारी नवापूर योगेश हिवराळे यांच्या पथकाने कारवाई केली परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कारवाईने समाधान व्यक्त केले .
खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांनी ज्यादा दराने खते विक्री होत असल्यास कृषी विभागाशी संपर्क करून तक्रार करावी तसेच, दुकानदारांनी जादा दराने विक्री करू नये अन्यथा विक्री केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येईल.
मोहन वाघ
विभागीय कृषी सहसंचालक








