Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोलगी परिसराला समस्यांचे मृगजळ, विविध मागणीसाठी नागरिकांचे बेमुदत उपोषण

team by team
June 15, 2023
in राजकीय
0
मोलगी परिसराला समस्यांचे मृगजळ, विविध मागणीसाठी नागरिकांचे बेमुदत उपोषण

मोलगी | वार्ताहर

स्वतंत्र भारताचाच अविभाज्य भाग असलेल्या मोलगी परिसराला लागलेले समस्यांचे ग्रहण सुटत नाही. वर्षानुवर्षे ते प्रलंबित राहिल्या या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु प्रशासन त्याची दखलच घेत नाही. त्यामुळे नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरले असून त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे.

मोलगी परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे नितांत आवश्यक आहे. परंतु सुविधा होण्याऐवजी या भागातील नागरिकांच्या समस्यांमध्ये दुपटीने भर पडत आहे. स्वातंत्र्योत्तर कालावधीत या परिसरातील जाणकार,संघटना व विविध घटकांच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु अपेक्षेनुसार समस्या सुटत नसल्याने पुन्हा हे आंदोलन करण्यात येत आहे.हे उपोषण दि.८ जून पासून सुरू असून मागण्यांची दखल घेतली न गेल्यामुळे हे आमरण उपोषण बेमुदत सुरुच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.आज उपोषणाच्या सातवा दिवस असून उपोषणकर्त्यांमध्ये रामसिंग वळवी,रुषाताई वळवी, बटेसिंग वळवी,बारदा वळवी,दिनेश वळवी,बामण्या वळवी,यांचा समावेश आहे.

 

प्रमुख मागण्या
▪️मोलगी तालुका निर्मिती करणे
▪️नर्मदा काठावरील शाळा स्थलांतर थांबविणे
▪️खेडोपाड्यातील लाईटचा प्रश्न सोडविणे.
▪️तळोदा प्रकल्प कार्यालयाचे उप कार्यालय मोलगी येथे सुरु करणे.
▪️मोलगी परिसरासाठी नायब तहसीलदार व गटविकास अधिकारी पद मंजूर करणे.
▪️मोलगी येथे नवीन राष्ट्रीयकृत बँकेची मागणी.
▪️मोलगी येथील ग्रामिण रुग्णालयाला जिल्हा उप रुग्णालयाचा दर्जा देऊन आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे.
▪️परिसरातील महसुली गावांचे सीमांकन करणे.
▪️परिसरातील प्रधान मंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे.
▪️ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरू करणे.
▪️डोंगराळ भागातील सर्व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, आरोग्य रक्षक, कृषी सहाय्यक यांनी आपल्या सजेच्या ठिकाणी राहून लोकांना सेवा देणे.
▪️मोलगी येथील ग्रामिण रुग्णालयाला जिल्हा उप रुग्णालयाचा दर्जा देऊन आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे.
परिसरातील महसुली गावांचे सीमांकन करणे.
▪️परिसरातील प्रधान मंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत झालेल्या रस्त्याची दुरवस्था.
▪️ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरू करणे.
▪️डोंगराळ भागातील सर्व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठी,ग्रामसेवक, वनरक्षक,आरोग्य रक्षक,कृषी सहाय्यक यांनी आपल्या सजेच्या ठिकाणी राहून लोकांना सेवा देणे.
अशा अनेक मागण्यांसाठी शासकीय विश्रामगृह मोलगी येथील उप विभागीय अभियंता सा. बा.विभाग यांचे उप विभागीय कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे दुकानाला लागली आग..

Next Post

पोलीस दलातर्फे ” ऑपरेशन अक्षता ” अंतर्गत तीन महिन्यात रोखले 26 बालविवाह

Next Post
पोलीस दलातर्फे ” ऑपरेशन अक्षता ” अंतर्गत तीन महिन्यात रोखले 26 बालविवाह

पोलीस दलातर्फे " ऑपरेशन अक्षता " अंतर्गत तीन महिन्यात रोखले 26 बालविवाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add