नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील जुनी जिल्हा परिषद शाळेच्या जवळील बी के फुटवेअर दुकानाचा मागील नाष्टा दुकानाला रात्री ९:३० वाजेचा सुमारास शॉट सर्किट मुळे अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली होती.
नवापूर शहराच्या मध्य भागात असलेले नाष्टा दुकाना जवळुन सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अहिरे जात असतांना दुकानातुन धुर निघतांना त्यांना दिसले त्यांनी समयसुचकता दाखवुन स्थानिक रहिवासी राहुल मराठे,भुषण पाटील,तनवीर शेख,गुड्ड मनसुरी यांनी दुकानाचे मालक दिपेश शशीकांत पंचोली यांना फोन करुन बोलावुन दुकान आग लागल्याचे सांगितले.दिपेश पंचाली लगेच येऊन दुकानाचे शटर उघडले तर मोठी आग दुकानात लागली होती.जितेंद्र अहिरे यांनी नवापूर नगरपालिकेचे अग्रिशमन बंबला कळविताच
अग्रिशाम बंमचे कर्मचारी संतोष सोनार,राजेश गावीत,आनंद साळवे,सलीम शोख यांनी आग विझवली.ही दुकान शहराच्या मुख्य बाजारात असल्यामुळे शहरातील नागरीकांनी आग बघण्यासाठी गर्दी केली होती. जितेंद्र अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत प्रसंगावधान ओळखून आगीची माहिती लगेच दिल्यामुळे मोठा अनर्थ ठरला नाही तर या भागातील रांगेत असलेली नवी व जुनी दुकाने जळून खाक झाली असती.या आगीची जोरदार चर्चा शहरात सुरु आहे.या ठिकाणी आग विजवितांना हिंदु मुस्लिम एकतेचे दर्शन घडुन आल्याचे चिञ पहावयास मिळाले आहे








