नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या नंदुरबारात येत असून दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आयोजित मेळाव्याला व्ही.जी.राजपूत लॉन्स येथे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील हे नवापूर येथे एका खाजगी संस्थेच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार रेल्वेने काल (दि.१५) सकाळी ८:२३ वाजता रेल्वेने नंदुरबार रेल्वेस्थानकावर येणार आहेत.यानंतर शासकीय विश्रामगृहात आगमन होणार असून यानंतर दौरा राखीव ठेवण्यात आला आहे. दुपारी १ वाजता व्ही.जी.राजपूत लॉन्स येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या निवासस्थानी आगमन होणार आहे.यानंतर ५:२० वाजेच्या सुमारास सायंकाळी मोटारीने दोंडाईचा येथील केशरानंद मैदानाकडे रवाना होणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा निरीक्षक नाना महाले व जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी केले आहे. सायंकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोंडाईचा येथे ज्ञानेश्वर भामरे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.








