नवापूर l प्रतिनिधी
शहरातील अग्रवाल भवन येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याचा अध्यक्षस्थानी धुळे ग्रामीणचे माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. शरद पाटील होते.
यावेळी सहसंपर्क प्रमुख अरुण चौधरी,जिल्हा समन्वय दिपक गवते,धुळे प.सचे माजी सभापती कैलास पाटील,उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील,युवती सेना जिल्हाध्यक्ष मालती वळवी,तालुका प्रमुख कल्पित नाईक,शिवसेना उपतालुका प्रमुख गोटु पाटील,
तालुका संघटक देवका पाडवी,शहर प्रमुख अनिल वारुडे,उपजिल्हा संघटक मनोज बोरसे,युवासेना जिल्हा उपअधिकारी दिनेश भोई,किसन शिरसाठ, शहर अधिकारी राहुल टिभे,राहुल अहिरे,भटु ढोले,परेश फेगडे आदि उपस्थित होते.दिपक गवते,मालती वळवी,हसमुख पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.या तालुका मेळाव्यात आगामी निवडणुका व संघटन वाढीसाठी चर्चा झाली.
यावेळी संपर्कप्रमुख प्रा.शरद पाटील म्हणाले की, नवापूर शहर व तालुक्यात शिवसेनेचे संघटन वाढविण्याची गरज असून त्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गाव पाड्यावर प्रत्यक्ष जाऊन लोकांचे प्रश्न सोडवावे.आज शिवसेनेचे संघटन व पक्ष बांधणी करणे तेवढेच महत्त्वाचे ठरले असून काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात शिवसेना आजही आपले अस्तित्व टिकून असल्याच्या अभिमान आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतांना चांगले काम केले असुन कोरोऩा काळात त्यांनी केलेल्या कामामुळे आपण आज सुरक्षीत आहोत.ते पुन्हा मुख्यमंत्री होतील असा आम्हा सर्वांना विश्वास असून पुढच्या काळात फक्त शिवसेना दिसून येईल.
शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी संपर्क कार्यालय सुरू करून त्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवावे.काम करणाऱ्या शिवसैनिकांना यापुढे पद दिले जातील असे ही त्यांनी ठणकावून सांगितले.जुने व नवे शिवसेनिक यांनी सोबत राहून एकजुटीने शिवसेना वाढीसाठी ताकद लावावी.सामाजिक उपक्रम राबवुन त्या माध्यमातुन जनतेची सेवा करावी असे सांगितले.
दिपक गवते म्हणाले की, जिल्हात संपर्कप्रमख शरद पाटील यांचे काम जोमाने सुरु आहे.जुने व नवे शिवसैनिक जोमाने काम करत आहे.गदारांना आपल्या कामातुन उत्तर द्यायच आहे. जिल्हा शिवसेनामय करायच आहे.नवापूर भागात अनेक वर्ष मंत्री व खासदार राहुन ही, नवापुरचा काहीच विकास झाला नाही.ही शोकांतिका आहे.
अरुण चौधरी म्हणाले की, जिल्ह्यात संघटना बांधणीची गरज आहे.पक्ष वाढला तरच शिवसैनिक वाढतील,गट व गणात जाऊन लोकांचे प्रश्न सोडवा.काम करा याचा परिणाम संघटन व निवडणुकीत दिसेल. हसमुख पाटील,मालती वळवी,मनोज बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन शहराध्यक्ष अनिल वारुळे यांनी केले तर आभार किसन शिरसाठ यांनी मानले.
प्रा.शरद पाटील सरांनी घेतला शिवसैनिक विद्यार्थांचा वर्ग
प्राध्यापक शरद पाटील यांनी शिवसेना मेळाव्यात शिवसैनिका बरोबर संवाद साधून गाव पाड्यांवरील समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक शिवसैनिकाला प्रश्न विचारून उत्तर काढून घेतले.त्याची नोंद त्यांनी स्वता डायरीत करुन घेतली.महिला व युवती वर्गाशी त्यांनी संवाद साधत त्यांचे प्रश्न व समस्या जाणुन घेतल्या.
प्रा. शरद पाटील यांनी अधुन मधुन अहिराणी मध्ये संभाषण करुन हास्यविनोदाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कान टोचले. शिवसेना स्टाईलने त्यांनी आपल्या भाषणात खूप काही सांगत शिवसैनिकांना संघटन व त्याची बांधणी कशी करावी याचा वस्तू पाठ शिकवला.
प्रा.शरद पाटील नवापूर शहरात प्रथमच आले.मेळावा घेतला. यावेळी त्यांनी नवापूर तालुक्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती जाणुन घेतली.मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रत्येक शिवसैनिकांला नावानिशी संबोधन त्याचा कामाचे कौतुक करत त्यांचा उत्साह वाढवला.
या मांडल्या समस्या–
यावेळी गाव व पाड्यांवरील शिवसैनिकांनी प्रा.शरद पाटील यांचा समोर येऊन समस्या मांडल्या.त्यात संपर्क कार्यालय सुरु करावे.विसरवाडी येथे रेशन मिळत नाही,घरकुल मंजुर होत नाही,पदाधिकारींनी गावात जाऊन समस्या जाणुन घ्याव्या,
विसरवाडीत शेतकर्यांना खत मिळत नाही.ट्रामा केअर सेंटर असुन कर्मचारी अभावी सुरु नाही.अधिकारी काम करत नाही.








