म्हसावद l प्रतिनिधी
अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, मोहिदे त.श. ता.शहादा जि.नंदुरबार या आय.एस.ओ. मानांकन प्राप्त शासकीय निवासी शाळेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी सेमी इंग्रजी मध्यामाच्या इयत्ता ६ वी च्या ४० व ७ वी ते १० या वर्गाच्या रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक एस.के केदारे यांनी दिली.
या निवासी शाळेची सर्व सुविधायुक्त सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसरात असून विद्यार्थ्यांना मोफत निवास, शालेय व इतर साहित्य, मोफत शिक्षण, गणवेश, क्रीडा साहित्य, व्यायामशाळा, संगणक कक्ष, भोजनाची व्यवस्था, क्रीडांगण यासह सर्व वर्गात डिजिटल अध्यापन व्यवस्था आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सी.सी.टी.व्ही. सह सिक्युरिटी इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध आहेत.
एस.सी. ८० टक्के , एस.टी. १० टक्के व्ही.जे. एन. टी. ०५ टक्के , एस.बी.सी. ०२ टक्के तर दिव्यांग प्रवर्गासाठी ०३ टक्के राखीव जागा आहेत. तरी विद्यार्थी व पालक यांनी प्रवेशाकरिता मोहिदे त.श. येथील शाळेशी संपर्क करावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक डॉ.एस.के. केदारे (९७६७८७२०७९) यांनी केले आहे. प्रवेशासाठी सहायक शिक्षक बी.आर.माळी(७६२०३२५२३२), आर.एस.वळवी(८६२३८०२७२४) एस.बी.ढगे(७७०९९८९५४४) यांचेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.








