Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जी-२० प्रतिनिधींनी घेतले श्री संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन; याची देही याची डोळा अनुभवला पालखी सोहळा

team by team
June 13, 2023
in राज्य
0
जी-२० प्रतिनिधींनी घेतले श्री संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन; याची देही याची डोळा अनुभवला पालखी सोहळा

पुणे l

जी-२० ‘डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट’ बैठकीसाठी पुण्यात उपस्थित देश विदेशातील प्रतिनिधींनी पालखी सोहळ्याला हजेरी लावत ‘याची देही याची डोळा’ महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवली. यावेळी काही प्रतिनिधींनी श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.

पालकमंत्री चंदकांत पाटील यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज पादुका मंदिरजवळ फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार येथे जी-२० प्रतिनिधींसाठी पालखी सोहळा अनुभवण्यासाठी मंडप उभारून प्रशासनाच्या आणि पुणे महानगर पालिकेच्यावतीने व्यवस्था करण्यात आली होती. पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

प्रारंभी ढोल ताशांच्या गजरात आणि तुळशीमाळा, वारकरी उपरणे, टोपी घालून प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखी रस्त्यावरून दिंड्यांचे आगमन होऊ लागले. हाती भगव्या पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीची रोपे, कपाळाला टिळा, टाळ, मृदंग, वीणा वादनात, ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोषात, अभंग गायनात, फुगडी, नर्तनात दंग वारकरी पाहून प्रतिनिधी वेगळ्याच अनुभवात दंग झाले. यावेळी काही प्रतिनिधींनी वारकऱ्यांकडून कपाळाला टिळा लावून घेतला.

ढोल ताशाच्या तालावर काही प्रतिनिधी नर्तनात दंग झाले. काही प्रतिनिधींनी उत्साहाने वारकऱ्यांसोबत फुगडीचा फेर धरला. महिला प्रतिनिधींनी डोक्यावर तुळशीची रोपे घेतली. सर्वच जण आपल्या मोबाईलमधून वारीची छायाचित्रे काढून घेण्यात दंग झाले. प्रतिनिधींनी वारकऱ्यांना भारतीय पद्धतीने नमस्कार करत स्वागत केले. तत्पूर्वी केशव शंखनाद पथकाद्वारे करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शंखनादाचा तसेच ढोल पथकाच्या ढोल वादनाने वातावरणात जोश आणला.

पालकमंत्र्यांसह परदेशी प्रतिनिधींनी घेतले संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन

यावेळी दिंड्यांच्या शिस्तबद्ध रांगा पुढे सरकत असताना श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील पालखीच्या दर्शनासाठी गर्दीतून पुढे जाऊ लागताच काही परदेशी प्रतिनिधीही पालखीच्या दर्शनासाठी सरसावले. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील आणि जी- २० प्रतिनिधींनी भक्तीभावाने पालखीचे दर्शन घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्राच्या लोकनृत्यांनी परदेशी पाहुण्यांना दिला निखळ आनंद

Next Post

सोनवद येथे बालविवाह रोखला,आता वऱ्हाडीसह बैंड पथक,भटजी, आचारी यांच्यासह उपस्थितांवर होणार गुन्हा दाखल: पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add