Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार भोजन : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

team by team
June 11, 2023
in राजकीय
0
कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार भोजन : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
नंदुरबार l प्रतिनिधी
 मध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कामगारांना कामांच्या ठिकाणी भोजन मिळणार असल्याने ही योजना  कामगारासाठी उपयुक्त असल्याचे  प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
शासन आपल्या दारी’ मोहिमेत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते आज शहादा तालुक्यातील मुबारकपूर, तलवाडे, मळकाणी, फत्तेपूर या गावांत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, सरपंच मोहन ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.गावित म्हणाले की,महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना सुरू केल्या त्या योजना पैकी मुख्य योजना म्हणजे  मध्यान्ह भोजन योजना होय, त्याच प्रमाणे बांधकाम कामगारांना आरोग्य विषयक, शैक्षणिक, अपघाती मृत्यू, नैसर्गिक मृत्यू, तसेच कामगाराच्या मुलांसाठी शिक्षण खर्च, लग्नासाठी 30 हजार आर्थिक मदत, घरे बांधण्यासाठी तसेच हत्यारे अवजारे खरेदी करण्यासाठी 5 हजाराचे अर्थसहाय्य,गृहपयोगी वस्तु संच, सुरक्षा संच देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन  नोंदणी करणे आवश्यक आहे.
येत्या काळात आदिवासी विकास विभागामार्फत खावटी कर्ज तसेच इतर विविध योजनेचा लाभ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या नागरिकांचे ‘ड’ यादीत नाव नसलेल्या तसेच ज्या लोकांना घर नाही अशा पात्र व्यक्तिंना विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल देणार आहे. कामगारांनी आपल्या मुलांना उच्च व चांगले शिक्षण देण्यासाठी नियमित शाळेत पाठवावेत जेणे करून ते उच्चशिक्षित होतील असे त्यांनी सांगितले.
मध्यान्ह भोजन योजनेत कामगारांना दोन वेळा जेवणात रोटी, दोन भाजी, डाळ, भात व इतर पदार्थांचा देण्यात येईल .कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत आहेर यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,कामगार उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये पावसामुळे मोठे नुकसान.

Next Post

आदिवासी विकास विभागाने दिली उभारी ; उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणाची शिदोरी

Next Post
आदिवासी विकास विभागाने दिली उभारी ; उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणाची शिदोरी

आदिवासी विकास विभागाने दिली उभारी ; उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणाची शिदोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add