Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जगात डंका: १२० देश,१३ हजार ८६८ लघूचित्रपटात नंदुरबारची “बटरफ्लाय’ ला मिळाले नामांकन, २५ जुन रोजी पुरस्कार वितरण

team by team
June 11, 2023
in राष्ट्रीय
0
जगात डंका: १२० देश,१३ हजार ८६८  लघूचित्रपटात नंदुरबारची “बटरफ्लाय’ ला मिळाले नामांकन, २५ जुन रोजी पुरस्कार वितरण

नंदुरबार l प्रतिनिधी

डॉ राजकुमार निर्मित व डॉ सुजित पाटील दिग्दर्शित “बटरफ्लाय’या हिंदी लघूचित्रपटाला अमेरिकेतील न्यू जर्सी येथे पार पडलेल्या “स्टूडंट वर्ल्ड इम्पॅक्ट फिल्म फेस्टीवल’मध्ये बेस्ट फिल्मसाठी नामांकन घोषीत झाले आहे.१२० देशांच्या १३ हजार ८६८ चित्रपटानी या फेस्टीवलमध्ये सहभाग नोंदवला असून त्यात बटरफ्लायची बेस्ट लघूचित्रपट म्हणून नामांकन जाहीर झाले आहे. २५ जून रोजी एका भव्य सोहळयात पुरस्कार वितरण केले जाणार आहे.

नंदुरबारच्या कलावंतांनी बनवलेल्या या हिंदी लघूचित्रपटाने दक्षिण कोरीयासह भारतात ५७ ॲवार्ड मिळवले आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांसह आता परिक्षकांच्या नजरेतही पसंतीस उतरला असून अमेरिकेत पुरस्कार मिळवणारा हा खानदेशातील पहिलाच चित्रपट ठरणार आहे.

सारझन शेट्टी,डाॅ विशाल पाटील, मानसिंग राजपूत या तिघांनी उत्तम अशी सिनेमाऑटोग्रफी केली असून सुंदर चित्रिकरणामुळे चित्रपट देखणा झाला आहे. रणजित राजपूत, डॉ राजकुमार पाटील,प्रशंसा तवर, कामिनी भोपे,डॉ जयंत शाह,दिपक पटेल, संदीप सुर्यवंशी, डॉ रोहन शाह, डॉ राजेश कोळी, हितल ठाकरे, नागसेन पेंढारकर,डाॅ अनिकेत गोटे, दिलीप सोनार, नंदा सोनार, पुनम भावसार,डाॅ वृशाली पाटील,डॉ स्वप्नील जैन, मनोज पिंपळे, जैनी जयेश,डॉ प्रशांत ठाकरे, नरेश शाह,रविंद्र पोतदार आदींनी महत्वाच्या भुमिका वठवल्या आहेत.

साऊंड अमित त्रिवेदी, प्रोडयूसर डिझायनर रूचिता पाटील, मिक्सिंग प्रशांत झोरे,संगितकार केयुर भगत, प्रियंका भगत,तसेच रूषभ पुणेकर, महेश बोलायकर, शिवाजी महाजन आदींनी चित्रपटाच्या सर्वांगिंन बाजूने कामे केली आहेत.

आता पर्यंत देशभरात ५७ अवार्डने सन्मानित बटरफ्लाय या चित्रपटाने १३ हजार ८६७ चित्रपटांमध्ये आधी नामांकन  घोषित झाल्याने नंदुरबारसह खानदेशासह महाराष्ट्राचा सन्मान झाला आहे.हे नामांकन  मिळाल्याने दिग्दर्शक डॉ सुजित पाटील यांचे कौतूक होत आहे.
परिक्षकांनी या चित्रपटाबद्दल खूप कौतूक केले आहे. अमेरिकेतील इंग्रजी भाषिक परिक्षकांनाही हा सिनेमा भावल्याने निर्माते डॉ.राजकुमार पाटील यांनी आनंद व्यकत केला आहे.

नंदुरबार शहरात या पुढे चित्रपटाची ही परंपरा अशीच सुरू रहावी,यासाठी शहरातील कलावंतांना घेऊन अशाच पध्दतीची कलाकृती निर्माण करू,असा विश्वास डॉ सुजित पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महेंद्र पब्लिक स्कूल,पिनल शाह, निलेश तवर यांनी या चित्रपटाच्या सहाय्यक निर्माते म्हणून काम पाहिले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुक्यातील बोगस रस्त्यांच्या कामाबाबत स्थायी सभेत जि. प.सदस्य आक्रमक

Next Post

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये पावसामुळे मोठे नुकसान.

Next Post
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये पावसामुळे मोठे नुकसान.

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये पावसामुळे मोठे नुकसान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add