Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या युवकाला अटक

team by team
June 10, 2023
in Uncategorized
0
नंदूरबार येथे आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या युवकाला अटक
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे एका युवकाने सोशल मीडियावर  आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून शहर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियाचा वापर करमणूक व ज्ञान मिळविण्यासाठी केला जात असतो. परंतु सोशल मीडियावरुन काही लोक सार्वजनिक शांतता भंग होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट, लेख लिहुन खोडसाळपणा करतात. म्हणून सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून पोस्ट करतांना सामाजीक भान ठेवावे व कोणतीही पोस्ट सोशल मीडियावरुन (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सऍ़प) प्रसारित करतांना ती पोस्ट आक्षेपार्ह आहे अगर कसे ? याबाबत खात्री करुन मगच ती प्रसारित करण्याची काळजी घ्यावी. आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणाऱ्या इसमांविरुध्द् भारतीय दंड संहीता व माहीती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील तसेच सायबर सेल नंदुरबार यांच्याकडून वृत्तपत्र व सोशल मीडियाद्वारे वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात येत असते.
तरी देखील काही नागरिक काही गोष्टींचे निषेेधार्थ किंवा समर्थनार्थ म्हणून सोशल मीडियावर शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो असे स्टेटस किंवा मजकूर प्रसारित करुन सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेटस किंवा मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश  पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.  पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,
नंदुरबार शहरातील भोणे फाटा भागातील एका तरुणाने त्याच्या व्हॉट्सऍ़प या सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह व सार्वजनिक शांतता भंग करणारे स्टेटस ठेवून ते प्रसारीत केले होते. त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने  पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदरची माहिती सांगून संशयीत आरोपीतास तात्काळ ताब्यात घेवून त्याच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई करणेबाबतचे आदेश दिले. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने भोणे फाटा भागातील आक्षेपार्ह स्टेटस ठेवून प्रसारित करणाऱ्या इसमास ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन त्याच्याविरुध्द् कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना इशारा देण्यात येतो की, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍ़प, ट्विटर किंवा इतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह, सार्वजनिक शांतता भंग करणारे व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारित करु नये किंवा त्याबाबत सोशल मीडियावर स्टेटस ठेवू नये. तसेच कोणीही कायदा हातात घेवून सार्वजनिक शांतता भंग करु नये, तसे आढळून आल्यास संबंधीतांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा  पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिला आहे. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून प्रसारीत करण्याचे दिसून आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
बातमी शेअर करा
Previous Post

रूपाली चाकणकर व जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नवापूर तालुक्यात 15 जुन रोजी विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

Next Post

ऑनलाईन नोंदणी करून कामगारांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
ऑनलाईन नोंदणी करून कामगारांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

ऑनलाईन नोंदणी करून कामगारांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add