Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्याच्या मुलाचा डंका: देशभरात केवळ 7 जागा, आसाणे येथील विशाल पाटील ने मिळवला तिसरा क्रमांक

team by team
June 8, 2023
in राष्ट्रीय
0
शेतकऱ्याच्या मुलाचा डंका: देशभरात केवळ 7 जागा, आसाणे येथील विशाल पाटील ने मिळवला तिसरा क्रमांक
नंदूरबार l प्रतिनिधी
शेतीकाम करणारा बाप आणि मोलमजुरी करणारी माय यांच्या लेकराने मोठ्या कष्टाने यश मिळवले आहे. नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथील विशाल निंबा पाटील याची ज्युनिअर कमिशन ऑफिसर या पदासाठी भारतातून सात जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. भारतातून सात जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत निवड त्याची झाली असून त्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही परीक्षा पास झाल्यामुळे इंडियन आर्मी इंजिनिअरिंग फोर्समध्ये विशालची निवड झाली आहे.
नंदूरबार तालुक्यातील आसाणे येथील चि.विशाल निंबा पाटील यांची इंडियन आर्मी बीआरओच्या इंजिनिअरिंग फोर्समध्ये जुनिअर कमिशन ऑफिसर पदी निवड झाली आहे.नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत त्याला हे यश मिळाले आहे देशभरात  फक्त सात जागांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यात विशाल पाटील हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आला. विशाल यांची घराची परिस्थिती हालाखीची असल्याने शिक्षणाची जिद्द असल्यामुळे नंदुरबार सोडून जळगाव या ठिकाणी जाऊन पार्ट टाईम जॉब करून शिक्षण घेतले व एम.एस.सी. पर्यंत शिक्षण झाल्या नंतर त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्याने विशाल  यास यश मिळालं,
संपूर्ण भारतातून भारतीय आर्मी इंजिनिअरिंग विभागाच्या सात जागा होत्या, या सात जागांमध्ये विशाल पाटील यांचा तिसरा क्रमांक आल्याने कुटुंबातील सदस्यांनी गावातील लोकांना पेढे भरत आनंद उत्सव साजरा केला.गावकर्यांनी विशालची गावातून भव्य मिरवणूक काढली विशाल पाटील हा ग्रामपंचायत सदस्या सौ. नर्मदाबाई निंबा पाटील व गुरुदत्त मंडप चे मालक निंबा काशिराम पाटील यांचा सुपुत्र असून स्टॅम्प वेंडर दादाभाई पाटील व पत्रकार पंढरीनाथ पाटील यांचा पुतण्या आहे. विशालला मिळालेल्या यशात आजोबा आई वडील यांचा आशीर्वाद व काकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
बातमी शेअर करा
Previous Post

निवेदिता राजपूत यांची पुणे येथे नामांकित कंपनीत मॅनेजरपदी नियुक्ती

Next Post

शहादा येथे महावितरण नंदुरबार मंडलचा१८ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

Next Post
शहादा येथे महावितरण नंदुरबार मंडलचा१८ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

शहादा येथे महावितरण नंदुरबार मंडलचा१८ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add