नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील कुंभार गल्ली भागातील बालवीर चौकात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडीकोंडा तोडून चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बालवीर चौक, कुंभार गल्ली भागातील रहिवासी महेंद्र लक्ष्मण वाघ नातेवाईकांच्या लग्नानिमित्त परिवारासह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला.यावेळी कपाटातील लहान मुलांचे चांदीचे वाळे तसेच सोन्याचे ओम पान व नथ तसेच रोख रक्कम असा दहा हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला.
याप्रकरणी गुन्हे शोध पथकाचेपोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.याबाबत महेंद्र वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भादवि कलम 452,457,480 प्रमाणे अज्ञात चोरटयां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार रायसिंग वळवी करीत आहेत.








