नंदुरबार-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा नंदुरबार येथील क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठानच्या वतीने पंचामृताभिषेक करुन साजरा करण्यात आला. यावेळी जुनी नगरपालिका जागेवरील छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृृती पुतळ्यास पुर्ष्पापण करुन अभिवादन करण्यात आले.

अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 शिवराज्याभिषेक सोहळा काल दि.6 जून 2023 रोजी नंदुुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या वतीने पंचामृताभिषेक अनोख्या उपक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी शहरातील जुन्या नगरपालिका परिसरात सुशोभित चबुतर्यावरील रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दही व दुध पंंचामृताने विधीवत अभिषेक करण्यात आले. या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, असा जयघोष करीत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण महेेश मराठे, हरीष हराळे, किरण गवळी, निलेश जगताप, मोहिनीराज राजपूत, भिमसिंग राजपूत, चेतन राजपूत, मुकेश मराठे, महेंद्र चौधरी, राजू मिस्त्री, उपेंद्र राजपूत, पप्पु मराठे, दीपक मराठे, राहुल मराठे, श्रीराम मोडक, मेघश्याम भोंगे, राकेश मराठे, गणेश मराठे, गुंजन सोनवणे, मयूर चौधरी, कृष्णाराजे प्रविण मराठे, चेतन सोनवणे, कुणाल फटकाळ आदी उपस्थित होते.








