Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावले पोलीस दल

team by team
June 6, 2023
in राज्य
0
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावले पोलीस दल
नंदूरबार l प्रतिनिधी
जून महिना सुरु झाला की, वादळ वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला जातो. ४ जून रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात विजांचा कडकडाट व वादळवाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
नंदुरबार जिल्ह्यात देखील  4 जून रोजी चक्री वादळाचा तडाखा बसला असून चक्री वादळामुळे जिल्ह्यातील अनेक घरांची छते /पत्रे उडाली, अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजुला असलेले झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प होवून जनजीवन विस्कळीत झले होते. झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. याबाबत  पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना संबंधीत पोलीस ठाण्यांकडून माहिती प्राप्त होत होती. अशावेळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करुन उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले होते.
नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील चिखली फाटा ते उमर्टी दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे कोसळल्यामूळे वाहतूकीची कोंडी झाली होती. म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार व त्यांच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. त्याचप्रमाणे धडगांव पोलीस ठाणे हद्दीत धडगांव ते तळोदा रोड व धडगांव ते मोलगी रोडवर वादळी वाऱ्यामुळे रस्त्यांवर पडलेली झाडे धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  इशामोद्दीन पठाण व त्यांच्या पथकाने रस्त्याच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.
त्याचप्रमाणे अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतून जाणारा अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर महामर्गावर कवली व खापर गावाजवळ रस्त्यावर 15 ते 20 झाडे कोसळल्यामूळे मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक खोळंबून पडली होती. अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांना सदरची माहिती मिळताच त्यांनी अक्क्लकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करुन वाहतूक सुरळीत करुन महामार्गावर अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका केली. तसेच नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील जुनी सावरट गावात वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे / छत उडून गेले होते.
नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी जुनी सावरट गावाचे पोलीस पाटील व नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने पत्रे / छत उडून गेलेल्या घरांवर गावातील नागरिकांच्या मदतीने पून्हा पत्रे बसवून त्यांना मदतीचा हात दिला. तसेच नवापूर शहरात देखील वाऱ्यामुळे झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी एम.एस. इ बी.च्या मदतीने बाजुला करुन वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केली.
तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मान्सूनपूर्व योग्य ती सर्व तयारी केली असून पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. पूर परिस्थिती किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत करण्यासाठी पोलीस ठाणे व पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोहणारे, शोध व बचाव साधनांची उपलब्धता करुन ठेवण्याचे देखील निर्देश दिले आहेत.
आपत्कालीन मदतीसाठी नागरिकांनी तात्काळ डायल-112 या टोल फ्री क्रमांकावर अगर नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज असून त्याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी प्रत्येक पोलीस ठाणे येथे 2 प्रशिक्षीत कर्मचारी असून आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारे जेसीबी, क्रेन, लाईफ जॅकेट, दोर इत्यादी साहित्य उपलब्ध करुन ठेवण्यात आलेले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

थकीत कर्जदारांना 50 टक्के सवलतीची योजना

Next Post

महाराष्ट्र अंनिसच्या जिल्हा शाखेला कोल्हापूरात लक्षवेधी पुरस्कार प्रदान

Next Post
महाराष्ट्र अंनिसच्या जिल्हा शाखेला कोल्हापूरात लक्षवेधी पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र अंनिसच्या जिल्हा शाखेला कोल्हापूरात लक्षवेधी पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add