Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वैशिष्ट्ये पूर्ण योजनेतून शहादा शहरातील विविध प्रभागात सात कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

team by team
June 5, 2023
in राजकीय
0
वैशिष्ट्ये पूर्ण योजनेतून शहादा शहरातील विविध प्रभागात सात कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्ये पूर्ण योजनेतून शहादा शहराच्या विविध प्रभागातील सुमारे सात कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन सोमवारी सकाळी आ.राजेश पाडवींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.*
आ. राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नांतून शहरातील विविध भागात विकास कामांसाठी शासकीय योजनांतून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.पालिका हद्दीतील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण,मजबूतीकरणासह ओपन प्लेस सुशोभीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे,संरक्षक भिंत आदि कामांसाठी पाठपुरावा केला जात होता.शासनाच्या वैशिष्ट्ये पूर्ण योजनेतून सुमारे सात कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.या कामांचे भूमिपूजन सोमवारी सकाळी करण्यात आले.
यावेळी आ. राजेश पाडवी यांच्यासह भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, विद्यमान संचालक मयूर दीपक पाटील, भाजपाचे तालुका कार्याध्यक्ष डॉ.किशोर पाटील, शहराध्यक्ष विनोद जैन, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, माजी नगरसेवक के.डी.पाटील, सुपडू आप्पा खेडकर, राकेश पाटील, एकनाथ नाईक, मुनेशचंद्र जगदेव, मोतीशेठ जैन,समीर जैन,ललीत छाजेड, राजाराम पाटील, पंकज सोनार, श्रीराम पाटील, सतीश जव्हेरी, सौ.शोभाबाई जैन,सौ.रोहिणी भावसार, वंदना सोनार, सौ.संगिता पाठक,मितेश्वरी पाटील, दिपश्री साठे, जयश्री सोनार, अनिल भामरे, रमाशंकर माळी, प्रदीप ठाकरे, गोपाल गांगुर्डे, कार्तिक नाईक, किशोर मराठे, संदीप गिरासे, प्रशांत कुलकर्णी, किरण सोनवणे, आत्माराम पाडवी, रूपेश पाटील आदिंसह त्या-त्या प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती.
   भूमिपूजन प्रसंगी बोलतांना आ.राजेश पाडवी व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील म्हणाले, अजुनही शहरातील विविध भागांतील विकास कामांसाठी पाठपुरावा सुरू आहे.पालिकेवर प्रशासक राज असले तरी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.
स्थानिक रहिवाशी व नागरिकांनी आमदार कार्यालयात संपर्क साधावा.आपल्या योग्य मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातील.भाजपा प्रदेश सरचिटणीस विजयचौधरी,भाजपा प्रदेश सदस्य तथा चेअरमन सातपुडा साखर कारखाना  दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर तालुक्यातील ग्रामीण भागातील रहिवाशांना सोयी सुविधा पुरवणे आमची जबाबदारी आहे व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
     या मॅरेथॉन भूमिपूजन कार्यक्रमास शहरातील भारतीय जनता पार्टी मोर्चा,आघाडी, पदाधिकारी,कार्यकर्ते,आजी माजी नगरसेवक,स्थानिक रहिवासी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आयोजन भाजपा शहर अध्यक्ष विनोद जैन, आमदार कार्यालयातील कर्मचारी यांनी केले होते.
बातमी शेअर करा
Previous Post

खा. अमोल कोल्हें यांचा पी.ए. च्या नावाने पोलिसांची फसवणुक करणाऱ्यास अटक

Next Post

वृक्षारोपणातून मानवी जीवनाकरीता आरोग्यदायी वातावरण निर्माण करावे :कृष्णा भवर

Next Post
वृक्षारोपणातून मानवी जीवनाकरीता आरोग्यदायी वातावरण निर्माण करावे :कृष्णा भवर

वृक्षारोपणातून मानवी जीवनाकरीता आरोग्यदायी वातावरण निर्माण करावे :कृष्णा भवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add