नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील कुकलट येथे मोठी पाणी टंचाई आहे.उन्हाळ्यात गावाला भीषण पाणी टंचाई जाणवत असते अशा वेळी गावातील महिला दूर दूर झिऱ्याच्या शोधात जंगलात जाऊन रात्रभर पाणी भरण्यासाठी जात असतात. लंडन स्थित वेल्स ऑन व्हील्स या संस्थेतर्फे 106 वॉटर ड्रम वाटप करण्यात आले.
लंडन (ब्रिटन) स्थित वेल्स ऑन व्हील्सचे संस्थापक अध्यक्ष शहाज मेनन, प्रकल्प संचालक अजय देवरे, प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले यांच्या वतीने आणि व्हाईट लोटस मल्टिपर्पज फाऊंडेशन संस्थेचे शगुणवंत पाटील , जलसाक्षरता समिती अक्राणी प्रा. डाॅ.एच. एम. पाटील यांच्या माध्यमातुन नंदुरबार जिल्ह्यातील ता.अक्राणी येथील कुकलट गावातील 106 कुटूंबाना पाण्याचे रोलर ड्रमचे मोफत वाटप करण्यात आले. उन्हाळ्यात गावाला भीषण पाणी टंचाई जाणवत असते अशा वेळी गावातील महिला दूर दूर झिऱ्याच्या शोधात जंगलात जाऊन रात्रभर पाणी भरण्यासाठी महिला, पुरुष जात असतात. वेल्स ऑन व्हील्स या संस्थेचे व्यवस्थापक नारायण गभाले, अजय देवरे , डब्ल्यू एल एम एस चे गुणवंत पाटील यांनी गावाची पाहणी करुन गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित केले.
ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये आणि गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी आणि डोक्यावर हंडा कमी व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वेळेची बचत होऊन पाठीचे, मानेच्या मणक्यांचे आजार उद्धभवणार नाहीत कारण बरीचशी घरातील कामे मुलींना करावी लागतात. ही अडचण ओळखून वेल्स ऑन व्हील्स या ग्रुपच्या माध्यमातून कुकलट गावाला पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले.
गावातील मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ लागत होता तो वेळ वाचेल. यावेळी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले, विजय देवरे, स्वप्निल पाटील, संकेत बिडगर, सुशांत भोसले, पवन वायदंडे, अमित ठाकरे , गुणवंत पाटील, जल साक्षरता समितीचे डाॅ प्रा. एच एम पाटील, जायंटस फेडरेशनच्या अध्यक्षा ॲड संगीता पाटील, सुभाष पावरा, कविता पाडवी, भरत पावरा,दशा पावरा आणि गावातील जलसाक्षरता समितीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.