Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठी बातमी : चार हजाराची लाच घेणाऱ्या आर. टी. ओ.विभागाच्या दोघांना दोन वर्ष कैदेची शिक्षा

team by team
June 3, 2023
in क्राईम
0
मोठी बातमी : चार हजाराची लाच घेणाऱ्या आर. टी. ओ.विभागाच्या दोघांना दोन वर्ष कैदेची शिक्षा

नंदूरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्रातून गुजरात राज्यात ट्रक जाऊ देण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाली चेक पोस्ट वर 4 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या आर टी. ओ. विभागाच्या मोटर वाहन निरीक्षक व सहाय्यक रोखपाल यांना शहादा न्यायालयाने दोन वर्ष कैदेची शिक्षा व 5 हजाराचा दंड ठोठावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सूर्यभान रेवजी झोडगे, तत्कालीन मोटर वाहन निरीक्षक, वेलजी नहाडिया मावची, सहाय्यक रोखपाल . दोन्ही नेमणूक , उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नंदुरबार हे २४ फेब्रुवारी २०१२ रोजी गव्हाली चेक पोस्ट ता. अक्कलकुवा येथे कर्तव्यावर होते. यावेळी मूळ तक्रारदार कंटेनर/ ट्रक चालक हे पुणे येथून त्यांच्या कंटेनरमध्ये माल भरून गुजरात राज्यात जात होते. २४ फेब्रुवारी २०१२ रोजी मूळ तक्रारदार हे गव्हाली चेक पोस्ट ता. अक्कलकुवा येथे आले असता मूळ तक्रारदार कंटेनर /ट्रक चालक यांच्याकडून त्यांची गाडी गव्हाली चेक पोस्ट मार्गे गुजरात राज्यात जाऊ देण्यासाठी ४ हजाराची लाच एन्ट्रीच्या स्वरूपात मागणी करुन ४ हजार रुपये लाच पंचां समक्ष स्वीकारली.

याबाबतच्या यशस्वी सापळा कारवाईनंतर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात सूर्यभान रेवजी झोडगे व वेलजी नहाडिया मावची यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७,१२,१३(१)(ई)(ड),१३(२) अन्वये गुन्हा दाखल होता. नमूद गुन्हयाच्या तपासा अंती दोष सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा सी.एस.दातीर यांनी सूर्यभान रेवजी झोडगे व वेलजी नहाडिया मावची या दोघांना भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये प्रत्येकी १ वर्ष कैदेची शिक्षा व ५ हजार दंड, कलम १३ (ड) अन्वये प्रत्येकी २ वर्ष कैदेची शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

तपास अधिकारी म्हणून तत्कालीन पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि नंदुरबार ए जी वडनेरे यांनी तर सरकारी वकील म्हणून स्वर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले.पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि , नंदुरबार राकेश आ. चौधरी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, नंदुरबार समाधान म. वाघ, पोलीस हवालदार अमोल मराठे यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात ९१.६० टक्के मिळवुन भूमिका पाटील प्रथम

Next Post

शहादा शहरात किरकोळ कारणावरून झाला वाद, समाज कंटकांचा बंदोबस्ताची मागणी

Next Post
शहादा शहरात किरकोळ कारणावरून झाला वाद, समाज कंटकांचा बंदोबस्ताची मागणी

शहादा शहरात किरकोळ कारणावरून झाला वाद, समाज कंटकांचा बंदोबस्ताची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add