तळोदा l प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्पर्शाने पावन अशा रायगडावरची पवित्र माती येथील युवकांनी आणली.त्यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी त्या मातीला मस्तकावर स्पर्श करून नतमस्तक होत.आदरभाव व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा राज्याभिषेक दिनानिमित्त शिव वंदन व रायगडाची पवित्र माती घेण्यासाठी शिवप्रेमी, देशभक्त, संस्कृती रक्षक, धर्माभिमानी यूवक मोटरसायकलीने रायगडावर गेले होते.यावेळी त्यांचावर फूलांचा वर्षाव करत “जय भवानी, जय शिवाजी” जयघोषात शूभेच्छा देण्यात आल्या होत्या.
तळोदा-शहादा तालुक्यातील हिंदु बांधवांचे प्रतिनिधीत्व करीत शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक दिनानिमित्त तळोदा व शहादा येथुन मोटारसायकलीने तरूण बांधव रायगड येथे रायगडावरील पवित्र माती घेण्यासाठी गेले होते. रायगडावर जाऊन शिववंदन करून, शिवाजी महाराजांप्रती आदर व्यक्त करून पवित्र माती घेऊन शिवभक्त परत आलेत त्यांचे आमदार राजेश पाडवी यांनी स्वागत करत.पवित्र माती मस्तकी लावत नतमस्तक झाले. शहादा येथील हिंदुत्ववादी संघटनांनी मिळून सर्व तरुणांसोबत शिववंदन केले होते.प्रवासमार्गात ठिक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना कडून नाश्ता,जेवण, निवास, व्यवस्था करण्यात आली होती.
नाशिक येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिवकालीन शस्त्रास्त्रे प्रशिक्षण वर्गात स्वागत व शिववंदन करण्यात आले नाशिक येथील इस्कॉन मंदिरात वनिवासाची सुविधा, शिवस्मारक पाथर्डी फाटा येथे शिवरायांच्या जयघोषाने शिववंदन व पुष्पवृष्टी करण्यात आली. विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वस्तीगृह घोटी येथे व्यवस्था केली होती.रस्त्यात गावोगावी शिवप्रेमी कडून स्वागत करण्यात आले आहे.