नंदुरबार l प्रतिनिधी
पाटलीपाडा येथे स्थानिक आमदार विकास निधीतून सभा मंडपाचे उद्घाटन आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
नंदुरबार तालुक्यातील पाटलीपाडा येथे स्थानिक आमदार विकास निधीतून करण्यात आलेल्या सभामंडपामुळे ग्रामस्थांची सोय होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी होते.यावेळी सभामंडपाचे फीत कापून उद्घाटन आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते सभा मंडपातील हनुमान मंदिरात आरती करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश गावित, पंचायत समितीच्या सभापती माया माळसे, पं.स सदस्य प्रल्हाद राठोड, सरपंच अमृत ठाकरे,उपसरपंच दिलीप ठाकरे, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रघुनाथ पाटील,ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद माळसे,ग्रामपंचायत सदस्य राजेश वळवी,नुरजा वळवी,पप्पू पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.उमेश शिंदे यांनी केले