Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

team by team
June 1, 2023
in राज्य
0
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत
नंदुरबार l प्रतिनिधी
 शासन आपल्या दारी मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज  सादर करण्याचे आवाहन  महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ.कैलास मोते यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. या घटकांत विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकु, संत्रा, मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लाभ देण्यात येणार आहे.
फुले घटकांत कट फ्लॉवर्ससाठी अल्प भूधारक शेतकऱ्यास 1 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार प्रति हेक्टर अनुदान तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल.
कंदवर्गीय फुलेसाठी अल्प भूधारक शेतकऱ्यास 1 लाख 50 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमान 60 हजार प्रति हेक्टर अनुदान तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 37 हजार 500 प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल. तर सुटी फुलेसाठी अल्प भूधारक शेतकऱ्यास 40 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 16 हजार प्रति हेक्टर अनुदान तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल.
 मसाला पिक लागवड घटकांत बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकासाठी शेतकऱ्यास 30 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 12 हजार प्रति हेक्टर अनुदान तर बहुवर्षीय मसाला पिकासाठी शेतकऱ्यास 50 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 20 हजार प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल.
विदेशी फळपिक लागवड घटकांत ड्रॅगनफ्रुट फळासाठी शेतकऱ्यास 4 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चांच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 60 हजार प्रति हेक्टर अनुदान तर स्ट्रॉबेरी फळासाठी शेतकऱ्यास 2 लाख 80 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चांच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 12 हजार प्रति हेक्टर अनुदान तसेच अवॅकॅडो फळासाठी शेतकऱ्यास 1 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चांच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रुपये अनुदान देण्यात येते. तर जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यास 40 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत खर्चांच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 20 हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते.
तरी या घटकांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ.मोते यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषकतत्वे शरीराला मिळणे गरजेचे : जि प अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित

Next Post

मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करावेत : राजेंद्र चव्हाण

Next Post
मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करावेत : राजेंद्र चव्हाण

मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करावेत : राजेंद्र चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add