नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील पेचरीदेव येथे एका पत्र्याचे शेडलगत मोकळ्या जागेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकून वाहने, मोबाईल व रोख असा १३ लाख ३९ हजार ५६० रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अक्कलकुवा तालुक्यातील पेचरीदेव परिसरात एका पत्र्याच्या शेडलगत सार्वजनिक जागेत झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असताना तेथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तेथे धाड टाकली असता तेथे तेरा जण मिळून आले. त्यांच्या ताब्यातील सहा मोबाईल त्याची किंमत ६१ हजार ५०० रुपये, १८ हजार ६० रुपये रोख , आठ मोटरसायकल किंमत २ लाख ६० हजार रुपये ,दोन चारचाकी वाहने किंमत १० लाख रुपये असा एकुण १३ लाख ३९ हजार ६६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोहेकॉ रवींद्र पाडवी यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीसात जयवंत राध्या पाडवी रा.उदेपुर ता. अक्कलकुवा , सलमान मुसा दावजी रा.सिदात फलीया गुजरात, संतोषभाई सामाभाई वसावा रा. सेलंबा गुजरात, राजेश कुंजीलाल कुशवाह रा. वराछा रोड गुजरात, विनय उर्फ विशाल धरमसिह रबारी रा. कठोर गुजरात, जयराम उर्फ जयेश बरवाभाई रबारी रा.अमरोली गुजरात, रफिकभाई देवाभाई अरब रा. सेलंबा गुजरात, विशाल प्रकाशभाई अध्यारु रा.विशावगा गुजरात, सलीम अकबर राठोड रा.अरबटेकडा गुजरात, आमील ईसाक मन्सुरी रा.सेलंबा गुजरात, प्रित चंदुलाल ठुमर रा.कडोदरा गुजरात, संजय तडवी रा.खापर कोराई अ कुवा, इम्रान मकराणी यांच्या विरुद्ध महा जुगार का. क.१२ (अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोउनि जितेंद्र महाजन हे करीत आहेत.