Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत

team by team
May 30, 2023
in राजकीय
0
राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत

मुंबई l

 

 

 प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास श्री. तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली असून उद्या त्यांच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

 

 

 

सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे नियुक्त राहण्याची सहमती दर्शवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, सचिन तेंडुलकर आणि वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी उद्या दि. ३० मे २०२३ रोजी सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम होईल. सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची सर्वदूर व्याप्ती पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.

 

 

राज्यात वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान‘ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने हे अभियान जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड, साडे तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत, १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

शैक्षणिक कर्ज घ्या… व्याजाचा परतावा शासन करेल

Next Post
शैक्षणिक कर्ज घ्या… व्याजाचा परतावा शासन करेल

शैक्षणिक कर्ज घ्या… व्याजाचा परतावा शासन करेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add