Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते जिल्ह्यातील एक हजार बांधकाम कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक व सुरक्षा संचाचे वितरण

team by team
May 21, 2023
in राजकीय
0
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते  जिल्ह्यातील एक हजार बांधकाम कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक व सुरक्षा संचाचे वितरण
नंदुरबार l  प्रतिनिधी

बालकांपासून ते थेट वयोवृद्ध नागरिकांसाठी विविध शासकीय योजना आहेत, या योजनांमध्ये इमारत बांधकाम कामगारांसाठीच्याही योजनांचा समावेश असून जिल्ह्यातील अशा प्रत्येक कामागाराला शासकीय योजना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

येथील कोरीट नाका परिसरातील बाफना कॉम्प्लेक्स येथे ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई तर्फे आयोजित नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी अत्यावश्यक व सुरक्षा संचाचे वाटप पालकमंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार डॉ. हिना गावित, कामगार अधिकारी अ. द. रूईकर, नोंदणी अधिकारी, विशाल जोगी, संजय कोकणी, केंद्र संचालक प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, सध्या राज्यभर ‘शासन आपल्या दारी’ मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार लाभार्थींना येत्या महिनाभरात लाभ दिला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील इमारत बांधकाम मजूरांना थेट लाभ देण्यासाठी कामगार कल्याण मंडळ थेट आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आले आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम अन्वये कामगारांची मंडळांमध्ये नोंदणी करताना मागील वर्षभरात किमान ९० दिवस बांधकामावर काम करणे अनिवार्य आहे. तसेच अधिनियमाच्या कलम ११ नुसार मंडळाअंतर्गत नोंदीत बांधकाम कामगार मंडळाच्या योजनेच्या लाभास पात्र आहेत.

मंत्री डॉ. गावित पुढे म्हणाले की, राज्यातील  बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावशक संच वितरित करण्यासाठी ५ लाख ८३ हजार  ६६८  इतक्या संच वाटपास मान्यता देण्यात आली असून त्यातील एक हजार जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आज एक हजार संचाचे वितरण करत असताना मनस्वी आनंद होत आहे.

बांधकाम कामगारांसाठी केंद्र व राज्याच्या २६ योजना – खासदार डॉ. हिना गावित

महाराष्ट्र शासनाने १ मे, २०११ रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केलेली आहे. राज्यातील इमारत व इतर बांधकाम आस्थापनाकडून जमिनीची किंमत वगळून बांधकाम खर्चाच्या १% दराने उपकर वसूल करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जमा करण्यात येत आहे.

जमा झालेला उपकर निधी राज्यातील इमारत व बांधकाम कामगाराच्या कल्याणकारी योजनासाठी वापरण्यात येत असतो. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे कामगार विभागाच्या कार्यालयामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यात येते. कामगाराने नोंदणी केल्यानंतर जीवित असेपर्यंत संबंधित कामगार मंडळाच्या सर्व योजनांचे लाभ घेण्यासाठी तो पात्र ठरतो. सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारांसाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध अशा २६ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात, या सर्व योजनांसाठी नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

वादळी वाऱ्यासह गारपीटमुळे नुकसान ग्रस्त भागाची आ. राजेश पाडवी पाहणी

Next Post

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0

Next Post
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add