नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील मनवानी येथे शेत मोजणीच्या वादातून सहा जणांना मारहाण केल्याप्रकरणी २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,धडगाव तालुक्यातील मनवानी येथील गिरीष केल्ला वळवी यांच्या शेत गट क्र.४९ मध्ये शेत मोजणीच्या कारणावरुन रावल्या दुधल्या वळवी यांच्यात वाद झाला. या वादातून गिरीष केल्ला वळवी, गोविंद दिनेश वळवी यांनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून दगड, लाठ्याकाठ्या व हाताबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत गिरीष केल्ला वळवी यांच्या फिर्यादीवरुन
धडगाव पोलिस ठाण्यात गिरीष केल्ला वळवी, गोविंद दिनेश वळवी, गिब्या भामट्या वळवी, सुकलाल भामटा वळवी, भटेसिंग भामटा वळवी व उमेश दिनेश वळवी यांना रावल्या दुधल्या वळवी, रुपसिंग खात्या वळवी, रामा दुधल्या वळवी, रोवा खात्या वळवी, हाअटीबाई रावल्या वळवी, रायलीबाई खात्या वळवी, मालती रुपसिंग वळवी, सुन्या महादू वळवी, सेल्या महादू वळवी, गारद्या महादू वळवी, सुरेश सुन्या वळवी, देवराम चमाऱ्या वळवी, मासलीबाई सेल्या वळवी, गुनीबाई सुरेश वळवी, सिता गुलाबसिंग वळवी, बिजराबाई सेल्या वळवी, वसंती अशोक वळवी, अशोक सेल्या वळवी, गुलाबसिंग गारद्या वळवी सर्व रा.मनवानी ता.धडगाव, चमाऱ्या बुल्या वळवी रा.त्रिशूल ता.धडगाव व दाजल्या दिवाल्या वळवी रा.गोरांबाचा पठालीपाडा ता.धडगाव या 22 जणांविरोधात भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४८, १४८, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राहूल पाटील करीत आहेत.








