नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कुलतर्फे ऑलम्पिक बुमरँग प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे १६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केली.
या प्रश्नमंजूषा स्पर्धा ऐलो हाऊस, ब्लू हाऊस, रेड हाऊस आणि ग्रीन हाऊस अशा चार गटात घेण्यात आली. प्रत्येक गटातून ज्युनिअर-सिनीअर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. स्पर्धेकरीता निरीक्षक म्हणून सारीका बारी, शीतल पाटील यांनी काम पाहिले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत रेड हाऊसने प्रथम क्रमांक मिळविला. विजयी विद्यार्थ्यांना चावरा स्कूलचे प्रिन्सिपल फादर टेनी, उपप्रिन्सिपल फादर सिजिन, जनरल कॉर्डिनेटर सिस्टर अनु यांच्या शुभहस्ते ट्रॉफी देण्यात आली. यशस्वी स्पर्धकांना क्रीडाशिक्षक डॉ.दिनेश बैसाणे, हाऊसचे प्रमुख किरण अहिरे, योगेश थोरात, पीटर चिनप्पा, मुद्दसर शेख, जयश्री राजपूत. नरेंद्र शिंदे या शिक्षकांचे स्पर्धकांना मार्गदर्शन लाभले.