नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा फाट्या जवळील टोल नाक्याचे बांधकाम सुरू असताना कठड्याला चार चाकी धडकल्याने एक जण ठार आठ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा फाट्या जवळ टोल नाका बांधकामाचे काम सुरू आहे. दरम्यान या ठिकाणी सुरू असलेल्या कामाबाबत वाहनांना येजा करण्यासाठी कोणतेही दिशा दर्शक फलक नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
काल रात्री गुजरात धुळे कडे जाणाऱ्या चार चाकी वाहन टोल नाक्यावरील कठड्याला जाऊन ठोकल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात एक महिला प्रवासी ठार झाली तर आठ जण जखमी झाले आहे.
अपघातानंतर तात्काळ विसरवाडी पोलीस व स्थानिक ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना विसरवाडी 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सदर अपघातामध्ये वसला गोवर्धन सोनवणे ही महिला मयत झाली आहे.तर हरीश मनोहर भालेराव, राहुल यशवंत नगराळे, सावित्री राहुल नगराळे, सरिता दीपक सोनवणे, प्रिया राजेंद्र सोनवणे, मानसी राजेंद्र सोनवणे, मनोज आधार सपकाळे, दक्ष राहुल नगराळे रा. सर्व अलका पार्क वसरापूर स्टेशन रोड अहमदाबाद हे जखमी झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची नोंद केली आहे.