नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यात अतिदुर्गम सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या गेंदामाळच्या एका दरीत पडलेल्या इसमाला तब्बल 36 तासाहून अधिक काळानंतर बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे.
सदर इसम हा मध्य प्रदेश राज्याचा रहिवाशी असून त्याचे नाव संजय माकड कुंड असे आहे. तो मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक दर्शनी प्रशासनाला माहिती मिळाली होती.
पाण्याच्या शोधात खाली दरीत उतरल्यानंतर वर येण्या साठी सदर इसमाला कठीण जात होते.
मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास दरीतून वाचविण्यासाठी आवाज येत असल्याने. स्थानिक नागरिकांनी पोलीस आणि वन विभागाला याबद्दल माहिती देऊन घटनास्थळी बोलवले होते. मात्र पोलीस आणि वन विभागाच्या मदतीने सदर इसमाला बाहेर काढण्यात अपयश आल्याने. एसटीआरएफ (आपत्ती निवारण दल) पथकाला धुळ्याहून बोलावण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरीत उतरून प्रशासनाने दरीत अडकलेल्या व्यक्तीला तब्बल 36 तासाहून अधिक काळानंतर बाहेर आणले आहे.
सदर इसम मध्य प्रदेश राज्याचा रहिवासी असून मनोरुग्न स्थितीचा असल्याने दरी मध्ये खाली पाण्याच्या शोधात उतरल्यानंतर वर येणे कठीण झाल्याने वाचवण्यासाठी हाक दिल्यानंतर प्रशासन व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून सदर इसमाला वाचवण्यात यश मिळविले आहे.